Bihar Crime News Esakal
देश

Bihar Crime News : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील रेस्टॉरंटमध्ये गोळीबार; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. राज्याच्या बेगुसराय जिल्ह्यात आणखी एका गोळीबाराची नोंद झाली आहे. तर बेगुसराय जिल्ह्यात एका सेवानिवृत्त शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.(Latest Marathi News)

सिटी एसपी अरविंद प्रताप सिंग, म्हणाले की, 'याठिकाणी किमान 10 राउंड गोळीबार झाला. प्रथमदर्शनी हा गोळीबार लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आलेला दिसतो. हा कुणालाही लक्ष्य करण्यासाठी केलेला गोळीबार नव्हता. आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे. यात 4 जणांचा सहभाग असून, सर्व आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

दरम्यान बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबार आणि हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आज या प्रकरणातील आणखी एका साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT