China Abducted Arunachal Pradesh Boy
China Abducted Arunachal Pradesh Boy sakal
देश

चीननं खरंच भारतीय तरुणाचं अपहरण केलं? महत्वाची माहिती आली समोर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : चीनने भारतीय तरुणाचे अरुणाचल प्रदेशातून अपहरण केल्याचा (China Abducted Arunachal Pradesh Boy)दावा एका खासदाराने केला होता. या प्रदेशातील सियांगा जिल्ह्यातील १७ वर्षांचा हा तरुण असल्याचं या खासदारांनी म्हटलं आहे. याबाबत तेजपूर संरक्षण क्षेत्राचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील १७ वर्षांच्या तरुणाचं चीनने अपहरण केल्याचं ट्विट खासदार तापिर गाओ यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी देखील मोदी सरकारवर टीका केली होती. त्याबाबत आता पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडेंनी सांगितलं की, ''एक बेपत्ता झालेला मुलगा सापडल्याचं चीनी सैन्यानं आम्हाला कळवलं आहे. त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.''

मिराम टॅरन तरुणाचं नाव -

चिनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यातील भारतीय हद्दीतून तरुणाचे अपहऱण केले आहे. तिथले भाजप खासदार तापिर गाओ यांनी बुधवारी ही धक्कादायक अशी माहिती दिली. मिराम टॅरन असं त्या तरुणाचं नाव असल्याचंही पीटीआयनं म्हटलं होतं.

खासदार तापिर गाओ यांचं म्हणणं काय? -

''चीनी सैन्याच्या कैदेतून सुटलेल्या दुसऱ्या एका मुलाने या अपहरणाची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. चीनी सैन्याने केलेल्या अपहरणाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तसंच सरकारी संस्थांकडून भारतीय तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न व्हावेत यासाठी विनंतीही केली'' असं खासदार तापिर गाओ म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT