देश

...म्हणून भाजप नेते येणार अडचणीत

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी कायदा शाखेचे शिक्षण घेणारी तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्यानंतर आज राजस्थानात आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित तरुणीला आमच्यासमोर सादर करा, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता स्वामी चिन्मयानंद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी शुक्रवारीच ही तरुणी राजस्थानमध्ये आढळून आली असून, आज तिला आई-वडिलांच्या भेटीसाठी शहाजहॉंपूर येथे आणण्यात येईल, असे सांगितले. यावर न्या. आर. बानूमथी आणि न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने संबंधित तरुणीला तुम्ही आमच्यासमोर कधी सादर करू शकता, अशी विचारणा वकिलांकडे केली. यावर वकिलांनीही संबंधित तरुणी ही पोलिसांच्या टीमसोबत असून, ती शहाजहॉंनपूरच्या दिशेने असून, नुकतीच ती फतेहपूरसिक्री येथे पोचली आहे, असे सांगितले.

तसेच न्यायालयाने आदेश दिल्यास अडीच तासांमध्ये तिला येथे आणता येऊ शकेल, असे सांगितले. यावर न्यायालयाने संबंधित तरुणीस दिवसभरात आमच्यासमोर सादर करा, असे सांगितले. 

म्हणणे ऐकून घेणार

आम्ही या तरुणीचे म्हणणे ईन कॅमेरा ऐकून घेऊ आणि त्यानंतर आदेश देऊ, असेही खंडपीठाने नमूद केले. दरम्यान वकिलांच्या संघटनेने या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिले होते. यानंतर गोगोई यांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली होती.

दरम्यान, संबंधित तरुणीने व्हिडिओ क्‍लिप प्रसिद्ध करत चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर ती संशयास्पदरीत्या गायब झाली होती. या व्हिडिओ क्‍लिपचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वकिलांच्या संघटनेने त्या विरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केली होती. तसेच आपण स्वत:हून याची दखल घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

Domestic Gas Cylinder Misused by Hotels : हॉटेलमध्ये घरगुती गॅस; भरारी पथक सुस्त

बोर्डाचा मोठा निर्णय! कॉपी रोखण्यासाठी आता ग्रामीणऐवजी शहरांमध्येच सर्वाधिक परीक्षा केंद्रे; बोर्डाची पथके तपासणार प्रत्येक केंद्रांवरील सुविधा, वाचा...

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

SCROLL FOR NEXT