vaccination File photo
देश

देशात लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी नाही; सरकारचं स्पष्टीकरण

कोविशिल्डच्या दोन डोसच्या शेड्युलमध्ये बदल नाही

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दोन भिन्न कोरोना लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनच्या (covaxin) दोन डोसच्या शेड्युलमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी ICMRचे प्रमुख बलराम भार्गव हे देखील उपस्थित होते. (Mixing of vaccines not approved yet says central gov)

भार्गव म्हणाले, "कोविशिल्डच्या डोसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचे दोन डोसच दिले जाणार आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस १२ आठवड्यांनंतर दिला जाणार आहे. कोवॅक्सिनचेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. याचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यानंतर दिला जाणार आहे. त्याचबरोबर लशींच्या मिक्सिंगबाबत अद्याप कुठलाही प्रोटोकॉल बनवण्यात आलेला नाही"

दरम्यान, भार्गव यांनी यावेळी यावरही भर दिला की, आंतरराष्ट्रीय संशोधकांकडून सध्या दोन भिन्न कंपन्यांच्या लशी एकत्र करण्यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनातून पॉझिटिव्ह परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पण याच्या निगेटिव्ह परिणामाची शक्यताही नाकारता येत नाही.

भारतात दोन भिन्न लशींच्या मिश्रणाची व्यवहार्यता तपासणी सुरु

भारतात लवकरच दोन भिन्न लशींच्या मिश्रणाची व्यवहार्यता तपासण्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये काम सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय कोविड-१९ ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली होती. उत्तर प्रदेशात सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० लोकांना चुकून पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असे देण्यात आले होते. यानंतर एकाच व्यक्तीला दोन भिन्न कंपन्यांच्या लशींचे डोस देण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT