देश

कौतुकास्पद! चक्क कोविडग्रस्त मंत्र्यांनी स्वच्छ केली वार्डमधील फरशी

त्यांचा हा फोटो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शर्वरी जोशी

देशात सध्या कोरोना विषाणूने (coronavirus) हाहाकार माजावला आहे. सामान्य असो वा सेलिब्रिटी आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. एकीकडे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतांना दिसत आहे. तर, दुसरीकडेच अशाही काही घटना घडत आहेत, ज्या पाहून अनेकांना दिलासा मिळत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर कोरोना योद्धा किंवा कोरोनावर हसहसत मात करणारे अनेक व्यक्ती आपण पाहिले आहेत. ज्यामुळे खरंच कोरोना रुग्णांना पुन्हा उभारी धरण्यास मदत मिळत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर मिझोरममधील (mizoram) एका मंत्र्यांचा फोटो व्हायरल होत आहे. स्वत: कोविडग्रस्त असतांनादेखील ते रुग्णालयात चक्क फरशी (लादी) पुसतांना दिसत आहे. त्यांचा हा फोटो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (mizoram power minister earns praise after photo of him mopping hospital floor goes viral)

सध्या सोशल मीडियावर मिझोरमचे ऊर्जामंत्री (power minister) आर. लालजिर्लियाना यांचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते स्वत: सरकारी रुग्णालयात फरशी पुसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते त्यांचं पद, त्यांचं आजारपण सारं काही विसरुन केवळ अन्य रुग्णांच्या काळजीपोटी हे करतांना दिसत आहेत.

"रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धडा मिळावा किंवा त्यांना लाज वाटावी यासाठी मी हे काम केलेलं नाही. वॉर्डमध्ये स्वच्छता राखली जावी यासाठी मी रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याला सांगितलं होतं. परंतु, त्यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मी स्वत: उठलो आणि फरशी पुसण्यास सुरुवात केली", असं लालजिर्लियाना म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "केर काढणं, फरशी पुसणं हे काम माझ्यासाठी नवीन नाही. मी घरी किंवा जिथे आवश्यकता असेल तिथे लगेच हे स्वच्छतेचं काम करतो. मी जरी मंत्री असलो तरीदेखील एक सर्वसामान्य नागरिक प्रथम आहे."

लालजिर्लियाना आहेत कोरोना पॉझिटिव्ह

७१ वर्षीय लालजिर्लियाना हे मिझोरमचे ऊर्जा मंत्री असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर जोराम मेडिकल कॉलेज या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोना झाल्यावर त्यांनी कोणतीही व्हिआयपी ट्रिटमेंट घेतलेली नाही. रुग्णालयात प्रत्येक जण व्यवस्थित काळजी घेत असल्यामुळे व्हीआयपी ट्रिटमेंटची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान, लालजिर्लियाना यांच्यासोबतच त्यांच्या मुलाला व पत्नीलादेखील कोरोना झाला आहे. प्रथम त्यांच्या मुलाला व पत्नीला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे त्यांनी १२ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT