Abu Azmi Sakal
देश

Ranveer Singh: न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? - आझमी

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांने न्यूड फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते.

सकाळ डिजिटल टीम

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यूड फोटोशूट खपवून घेतलं जात तर मग आपल्या मर्जीने परिधान केलेल्या हिजाबला विरोध का? असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. या फोटोशुटमुळे चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

(MLA Abu Azmi On Ranveer Singh Photo)

"शरीराचं प्रदर्शन करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आणि संपूर्ण शरीर झाकणाऱ्या हिजाबला विरोध का केला जातो?" असं आझमी म्हणाले आहेत. "रणवीर सिंगवर माझा आक्षेप नाही पण कोणीही निर्वस्त्र दिसलं नाही पाहिजे असा कायदा देशात आहे. आणि जो निर्वस्त्र दिसेल त्याच्यावर केस होते पण आज देशात उघड्या शरीराचं प्रदर्शन चालू आहे, हे कसं चालतं? इस्लाममध्ये महिलांनी संपूर्ण शरीर झाकणारे हिजाब घालणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे. या देशाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच मी पाकिस्तानात गेलो नाही आणि आज इथे मुस्लिमांवर बंधणे घातले जातात." असं मत आझमी यांनी व्यक्त केलं.

"माझ्या देशात हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्व जातींना समान अधिकार दिले आहेत. सर्वांना समान मुलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे मी पाकिस्तानला लाथ मारून भारतात आलो. तर आज भारतात मुस्लिम महिलांना हिजाबच्या नावाखाली अपमानित केलं जात आहे. त्यांना मारलं जात आहे. एकीकडे लोक निर्वस्त्रपणे हिंडत आहेत तर एकीकडे हिजाबला विरोध केला जात आहे." असं आझमी म्हणाले आहेत.

आमच्या महिलांनी हिजाब घातला तर त्याला धार्मिकतेचा रंग दिला जातो आणि एकीकडे लोक उघडे फिरतात तर आपल्याला नेमका समाज हवाय तरी कसा? असा सवाल आमदार अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT