mla jignesh mevani re arrested in new case after being granted bail in case over tweets on pm modi  
देश

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणींना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक

सकाळ डिजिटल टीम

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ट्विट केल्याप्रकरणी आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना नव्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मेवाणी यांना अटक करण्यासाठी आलेल्या आसामच्या बारपेटा येथील पोलिसांनी त्यांना कोणत्या प्रकरणात अटक केली आहे, याचा तपशील उघड केला नाही.

आदल्या दिवशी, मेवाणी यांना कोक्राझार न्यायालयाने पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या ट्विटशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. नंतर, सुनावणीनंतर मेवाणीला कोक्राझार तुरुंगात परत नेण्यात आले आणि त्यांच्या वकिलांनी सांगितले की ते जामीन बाँडशी संबंधित औपचारिकता पुर्ण करत आहेत.

आसामच्या कोक्राझार येथील स्थानिक भाजप नेत्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मेवाणी यांना 19 एप्रिल रोजी गुजरातमधील पालनपूर शहरातून अटक करण्यात आली होती, त्यानंतर कोक्राझार पोलिस ठाण्यात त्यांच्या ट्विटबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोडसेला देव मानतात असे म्हटले होते.

आमदार मेवाणी यांना ट्रान्झिट रिमांडवर कोक्राझार येथे आणण्यात आले आणि 21 एप्रिल रोजी कोक्राझारच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या अटकेनंतर, मेवाणी यांनी "पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) चे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले होते. तसेच हे भाजप आणि आरएसएसचे षड्यंत्र आहे. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी त्यांनी हे केले. ते हे पद्धतशीरपणे करत आहेत. त्यांनी रोहित वेमुलासोबत केले, चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत केले, आता ते मला लक्ष्य करत आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update : कुर्ल्यात इमारतीच्या पाचव्या माळ्याला आग

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT