Raj Thackeray 
देश

पुढील निवडणुका बॅलट पेपरवर घ्या : राज ठाकरे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज देशातील मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सहा पाणी पत्र लिहिलं आहे.या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी देशातील ईव्हीएम मतदान प्रणालीला विरोध केला असून नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालावर ही संशय व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी आज दुपारी 12 च्या दरम्यान देशातील मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन चर्चा केली.राज यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आठ मुद्द्यांच्या आधारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.आपल्या मागण्यांवर निवडणूक आयोगाने गंभीरपणे विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी ही राज ठाकरे यांनी केली आहे.

लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीत तफावत का असा प्रश्न राज यांनी उपास्थित केला आहे.शिवाय लोकांचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर अढळ विश्वास बसणे महत्वाचे असून ईव्हीएसमवर लोकांनी संशय व्यक्त करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम बाबत आपण अनेक तज्ज्ञांशी तसेच सामाजिक संघटनांशी चर्चा केली असून या सर्व घटकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्याने पुढील निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी ही राज ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिखलदऱ्याला जाण्यापूर्वी ही बातमी वाचा! वीकेंडला वनवे नियम लागू; प्रशासनाचा मोठा निर्णय

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे सहा हॉटेलांचे परवाने निलंबित, ७० हॉटेलांची तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर नेण्याचा घाट कुणासाठी? बच्चू कडू अन् संजय खोडके आक्रमक, सरकारला विचारला संतप्त सवाल

Pune News: कोट्यवधींचा खर्च, तरी गळके छत! कोथरूड स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल; पुणे महापालिकेची धावपळ

SCROLL FOR NEXT