देश

लिंक ओपन करताच मोबाईल झाला हँग; अर्ध्या तासात खात्यावरून पैसे गायब!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गुगलवरून मेक माय ट्रीपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी चौकशी केली. कस्टमर केअरने लिंक पाठविली. लिंक ओपन करताना मोबाईल हॅंग झाला आणि अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. सोलापुरात कपडे व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणुकीची घटना मंगळवारी समोर आली आहे. 

यश राजकुमार पंजवाणी (वय 25, रा. अंत्रोळीकर नगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश याने मोबाईलवरून गुगलवर जाऊन मेक माय ट्रीप कस्टमर केअर सर्च केले. तिथे मिळालेल्या क्रमांकावर यशने कॉल केला. हा बोलीऐ मैं रोहित बोल रहा हुं असे म्हणून समोरील व्यक्तीने संवादाला सुरवात केली. यशने त्याची कोइमतूर फ्लाईटचे तिकीट रद्द करण्याविषयी सांगितले.

आरोपी रोहित याने यशच्या मोबाईलवर लिंक पाठविली. यशने मी लिंक ओपन केली. त्यानंतर त्याचा मोबाईल हॅंग झाला. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर यशच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या कस्तुरबा मार्केट शाखेतील खात्यातून आरोपीने टप्याटप्याने 95 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना 3 जुलै 2019 रोजी ही घटना घडली असून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने यश पंजवाणी याने पोलिसात धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT