nuh clashes ANI
देश

Haryana Nuh: परवानगी नाही, तरी हिंदूत्ववादी संघटनांची नूहमध्ये पुन्हा मिरवणूक!; इंटरनेट, SMS सेवा राहणार बंद

कार्तिक पुजारी

Hindutva vhp outfits firm on Brij Mandal Jal Abhishek Yatra haryana Nuh Aug 28

चंदीगड- हरियाणाच्या नूह जिल्ह्यात दोन दिवस मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी कोणत्याही परिस्थिती २८ तारखेला धार्मिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद ठेवण्याचं ठरवलंय.

३१ जुलै रोजी नूह जिल्हात ब्रिज मंडल अभिषेक यात्रा काढण्यात आली होती. यादरम्यान दोन जमावामध्ये संघर्ष झाला होता. जवळपास ७-८ दिवस जिल्ह्यासह राज्यात तणावाची स्थिती होती. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी पुन्हा एकदा २८ तारखेपासून ही मिरवणूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली आहे, तरी हिंदू संघटनांनी मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे.

संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने आवश्यक ते पाऊल उचलले आहेत. या दिवशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. व्यायसायिक कामासाठी वापरली जाणारी इंटरनेट सेवा सुरु असणार आहे. २८ ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून आदेशाचे पालन होईल.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, '३१ जुलै रोजी थांबवावी लागलेली ब्रिज मंडल अभिषेक यात्रा पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे.' विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र जैन म्हणाले, 'काहीही झालं तरी मिरवणूक काढली जाणारच. नियोजनानुसार मिरवणूक निघेल. तो आमचा अधिकार आहे. आमची सुरक्षा ही प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या नियंत्रित करु, पण यात्रा निघणारच.'

नूह येथे धार्मिक मिरवणुकीवर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात हिंसाचार उभाळला होता. यात पोलिसांसह अनेकांचा मृत्यू झाला होता. दोन धार्मिक गटांच्या संघर्षात राज्याचे वातावरण कलुषित झाले होते. प्रशासनाकडून हिंसाचार थांबवण्यालाठी प्रयत्न करण्यात आले. राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले. त्यानंतर राज्यातील स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT