PM Modi 
देश

G20 Summit 2023: PM मोदींकडून G20 देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत; 'भारत' नावानं जगाला करुन दिली देशाची ओळख

दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या 'भारत मंडपम'मध्ये G20 शिखर संमेलनाला सुरुवात झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

G20 Summit 2023: दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या 'भारत मंडपम'मध्ये G20 शिखर संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्रध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. पण हे करत असताना त्यांनी देशाची ओळख 'इंडिया' अशी करुन न देता 'भारत' अशी करुन दिली.

त्यामुळं आता देशाचं नाव इंडियावरुन भारत करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचचं मानलं जात आहे. यासाठी केवळ संविधानिक प्रक्रियाच पार पडणं आवश्यक राहिलं आहे. (Modi addresses G20 meeting with country name identified as Bharat)

'त्या' संदेशानं G20 संमेलनाला सुरुवात

मोदी म्हणाले, "G20 परिषदेत भारत सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. यावेळी ज्या ठिकाणी आपण एकत्रित आहोत इथून काही किमी अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलंय की, मानवतेचं कल्याण आणि सुख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुयात" (Latest Marathi News)

परस्पर विश्वासाचं आवाहन

21 व्या शतकाचा हा काळ संपूर्ण जगला नवी दिशा देणारा महत्वाचा काळ आहे. हा तो काळ आहे जो अनेक वर्षांपासूनची आव्हानं आपल्याकडं नवा तोडगा मागत आहे. यासाठी आपल्याला मानवकेंद्रीत आपल्या प्रत्येक जबाबादारीनं आपल्याला पुढे जायचं आहे. कोविड १९ च्या काळात जगावर सर्वात मोठं संकट विश्वासाचं आलं होतं. (Marathi Tajya Batmya)

युद्धानं या विश्वासाला गेलेला तडा अधिक वाढवलं आहे. जर आपण कोविडला हारवू शकतो तर आपण परस्पर विश्वासावरच्या या संकटावर देखील विजय मिळवू शकतो. आज जी २० च्या अध्यपदावरुन भारत संपूर्ण देशाला आवाहन करतो आहे की, आपण मिळून सर्वात आधी हा जागतीक अविश्वासाला विश्वासात रुपांतरीत करुयात. (Latest Marathi News)

'सबका विश्वास, सबका प्रयास'

यासाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास'चा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक बनू शकतो. जागतीक अर्थव्यवस्थेत उलथापालथ असेल, उत्तर-दक्षिण अशी विभागणी असेल, पूर्व-पश्चिमेती दूरी असेल, अन्न-इंधन आणि खतांची व्यवस्था असो, दहशवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य-ऊर्जा-पाणी सुरक्षा असेल वर्तमानासह येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या ठोस उपायांकडं जावचं लागेल.

अफ्रिकन युनियनच्या समावेशानंतर आता G21 संमेलन

यावेळी मोदींनी G20 मधील देशांकडं मोदींनी अफ्रिकन युनियनला G20मध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं असा प्रस्ताव ठेवला होता. याला सर्वांची सहमती आहे का? असा प्रश्न यावेळी मोदींनी विचारला याला सर्वांनी संमती दिल्यानंतर मोदींनी आपल्याजवळील 'गॅवल' तीन वेळा वाजवून याला सर्वांची संमती असल्याचं जाहीर केलं. यानंतर संमेलनाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी अफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना G20 तील स्थायी सदस्य म्हणून स्थान ग्रहण करण्याचं निमंत्रण दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT