PTI
देश

मंत्रिमंडळ विस्ताराआधी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे

नामदेव कुंभार

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने सध्या सर्वांचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं आहे. देशभरातील खासदारांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे. अनेक अकार्यक्षम नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी याची प्रचितीही आली होती केंद्रीय मत्री गेहलोत यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं. आता यामध्ये आणखी काही मंत्र्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळाले आहेत. मोदी सरकारमधून काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

मिशन-२०२४ (mission 2024) डोळ्यांसमोर ठेवून भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे निश्तिच केल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना विविध राज्यांच्या विधानसभा आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखताना दिसते. सुत्रांच्या वृत्तानुसार, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनाही डच्चू देम्यात आल्याचं बोललं जात आहे. पश्चिम बंगालमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडूनही मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेमुळे केंद्रानं मंत्रिपद काढून घेतलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT