narendra modi  file photo
देश

मोदी सरकार 38 कोटी लोकांना देणार मोठी भेट

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून उचलण्यात आलेल्या या पावलामुळे 38 कोटी कामगारांना फायदा होणार आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकार आज ई श्रम पोर्टल सुरु करणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून उचलण्यात आलेल्या या पावलामुळे 38 कोटी कामगारांना फायदा होणार आहे. यामध्ये बांधकाम कर्मचाऱ्यांशिवाय प्रवासी कर्मचारी, घरेलू कामगार यांचाही समावेश आहे.

कामगारांच्या मदतीसाठी एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर सुरु करण्यात आला आहे. 14434 या नंबरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येईल. सरकार कामगारांना एक ई श्रम कार्ड देईल. यामध्ये 12 अंकी युनिक नंबर असणार आहे. ई श्रम कार्ड देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना एक नवीन ओळख मिळवून देईल. देशभरात हे कार्ड वैध असेल.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकार असंघटती क्षेत्रातील कामगारांचा डाटाबेस तयार करत आहे. त्यासाठी हे पोर्टल सुरु केलं आहे. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे एकीकरण करण्याचा उद्देश यामागे आहे. कर्मचाऱ्यांची माहिती राज्य सरकार आणि विभागांकडून देण्यात येईल. मंगळवारी कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई श्रम पोर्टलच्या लोगोचे अनावरण केले होते.

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कामगार त्यांच्या घरी परतले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर डेटाबेस तयर करण्याकडे लक्ष देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हेच चित्र दिसलं होतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लवकरात लवकर डेटाबेस तयार करण्यास सांगितलं होतं. यामुळे कामगारांच्या सामाजिक कल्याण किंवा इतर गरजा सहज पूर्ण करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT