Union Minister Ashwini Vaishnaw addresses the media after the Modi Cabinet meeting, revealing key policy decisions and government initiatives.  esakal
देश

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Major Decisions Taken in Modi Cabinet Meeting: जाणून घ्या, नेमके कोणते आहेत निर्णय? ; प्रधानमंत्री किसान संपदा योजनासाठी १९२० कोटींचा अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला आहे.

Mayur Ratnaparkhe

Modi Cabinet meeting: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित सहा निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दोन निर्णय शेतकऱ्यांशी संबंधित आहेत आणि चार निर्णय रेल्वेशी संबंधित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक झाली. बैठकीत 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' साठी १९२० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला आहे. आता या योजनेचे बजेट एकूण ६ हजार ५२० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

यासोबतच, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा अंतर्गत १०० NABL मान्यताप्राप्त अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. तसेच प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची एक घटक योजना असलेल्या एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा अंतर्गत ५० बहु-उत्पादन अन्न विकिरण युनिट्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या स्थापनेसाठी एक हजार कोटी रुपये आणि PMKSY च्या विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी ९२० कोटी रुपये  १५ व्या वित्त आयोगादरम्यान मंजूर करण्यात आले आहेत.

ICCVAI आणि FSQAI दोन्ही योजना PMKSY योजनेचा भाग आहेत. या दोन्ही योजना मागणीच्या आधारावर चालतात. अशा परिस्थितीत, देशभरातील पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी पत्र जारी केले जातील. विद्यमान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्रता निकषांनुसार AOI अंतर्गत प्राप्त प्रस्तावांना योग्य छाननीनंतर मान्यता दिली जाईल.

या बैठकीत इटारसी आणि नागपूर दरम्यान चौथा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. त्याच वेळी, अल्याबारी आणि न्यू जलपाईगुडी दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर ते परबणी मार्ग डबल  करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रेल्वे वाहतूक सुधारेल.

याचबरोबर सहकारी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी एनसीडीसीला बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची भांडवल दोन हजार कोटी रुपयांनी वाढविण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे नवीन धोरण अलिकडेच सुरू करण्यात आले. एनसीडीसीने दिलेल्या कर्जाचा निव्वळ एनएपी शून्य आहे. या योजनेअंतर्गत, पुढील चार वर्षांसाठी दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. एकूण २० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. याचा फायदा सुमारे १३ हजार सहकारी संस्था आणि ३ कोटी सदस्यांना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : महिला अत्याचारप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; आज सुनावली जाणार शिक्षा

Fake Shalarth ID Scam: न्यायालयाचे आदेश असूनही अटकेची कारवाई; शिक्षण सचिवांची पोलिस अधिकाऱ्यांना नाराजीची फोनवार्ता

Pune Municipal Corporation : प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात,आयुक्तांकडून आढावा; राज्य सरकारकडे सोमवारी होणार सादर

Monsoon Update: वरुणराजा मेहरबान, पाऊस सरासरीपार; विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये समाधानकारक वृष्टी

Manoj Jarange: आरोपींना तत्काळ अटक करा; जरांगे, महादेव मुंडे खून प्रकरण कारवाई न केल्यास बीड ‘बंद’चा इशारा

SCROLL FOR NEXT