Face Recognition system launching  Dr Jitendra Singh Twitter
देश

पेन्शनधारकांच्या फायद्यासाठी केंद्राने आणले नवे तंत्रज्ञान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील पेन्शनधारकांसाठी सरकारने फेस रिकग्निशन तंत्रज्ञान (Face Recognition Technology For Pensioners) आणले आहे. त्याचा फायदा सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांना होणार आहे. हे तंत्रज्ञान एक ऐतिहासिक आणि दूरगामी सुधारणा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी सांगितले.

हे चेहरा ओळखण्याचे एक तंत्रज्ञान असून केंद्रसरकारच्या ६८ लाख पेन्शधारकांच्याच नव्हे तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी फायद्याचे आहे, असेही सिंह यावेळी म्हणाले. तसेच केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांचे या तंत्रज्ञानासाठी आभार मानले. सेवानिवृत्त आणि पेन्शनधारकांचा अनुभव आपल्या देशासाठी संपत्ती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने पेन्शधारकांसह समाजातील इतर घटकांसाठी नेहमीच चांगले निर्णय घेतले. कोरोनाच्या काळात देखील पेन्शन विभागाने अतिशय चांगले काम केले, असेही सिंह म्हणाले.

पेन्शन विभाग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. इलेक्ट्रॉनिक पीपीओ जारी करण्याचा प्रयत्न आणि डिजी लॉकरचा वापर या विभागाच्या पारदर्कशकतेच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. विभाग पेन्शनधारक जागृतीसाठी ई-पुस्तिकाही आणत आहे. तसेच ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर जनजागृती मोहीम राबवत आहे. सोशल मीडियावर आम्ही काही माहितीपट टाकले आहेत. त्याला पेन्शनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असंही सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT