Delhi Deputy CM Manish Sisodia  esakal
देश

केंद्र सरकारला दिल्लीतील सरकारी शाळा बंद करायच्या, कारण...; सिसोदियांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारला दिल्लीतील सरकारी शाळा बंद करायच्या आहेत. यामुळेच ते आता दिल्लीतील शाळांमधील भ्रष्टाचारावर बोलू लागले आहे. या सर्व गोष्टी खोट्या आहेत, दिल्लीतील शाळांमध्ये मोठे काम झाले आहे, परंतु मुलांना सक्तीने खासगी शाळांमध्ये शिकणे भाग पडावे म्हणून त्यांना सरकारी शाळा बंद करायच्या आहेत, असा आरोप सिसोदिया यांनी केला.

मनीष सिसोदिया यांनी यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी पडलेल्या सीबीआयच्या छाप्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, दहा दिवसांपूर्वी सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापे टाकले होते. एवढा वेळ निघून गेला, तरी आजपर्यंत एजन्सी सांगू शकली नाही की माझ्या घरातून त्यांना काय मिळाले? भाजपवाल्यांनी दारू घोटाळ्याचे आरोप आधीपासूनच केले, पण त्यात काहीही सापडले नाही. तेव्हा आता ते शाळांमधील भ्रष्टाचारावर बोलत आहेत. त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत, असही सिसोदिया म्हणाले.

सिसोदिया म्हणाले की, आज दिल्लीत केवळ 20 टक्के मुले खासगी शाळेची फी भरण्याच्या स्थितीत आहेत. मात्र केंद्र सरकारला उर्वरित 80 टक्के मुलांना त्रास द्यायचा आहे. भाजपवाल्यांना शाळेतील भ्रष्टाचार संपवण्यात स्वारस्य नाही, त्यांना फक्त खाजगी शाळांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यासाठी ते सरकारी शाळा बंद करण्यावर बोलत असल्याचं सिसोदिया यांनी नमूद केलं.

सिसोदिया पुढे म्हणाले की, देशात २०१४ पासून भाजपचे सरकार आहे. या काळात त्यांनी अनेक सरकारी शाळा बंद करून खासगी शाळा उघडल्या. आज दिल्लीत त्यांना एफआयआर करून सरकारी शाळा बंद करण्याचे मिशन वाढवायचे आहे. 2015 ते 2021 पर्यंतची आकडेवारी सांगितली तर देशभरातील 72 हजार 747 सरकारी शाळा केंद्र आणि भाजप सरकारने बंद केल्याचा आरोपही सिसोदिया यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT