Lalu Prasad Yadav and Narendra Modi 
देश

Lalu Yadav: ऑगस्टपर्यंतच चालणार मोदी सरकार; लालू प्रसाद यादव यांचा दावा

राष्ट्रीय जनता दलाचा आज २८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा आज २८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाषण करताना लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला, तसेच सध्याचं केंद्र सरकार हे कमजोर सरकार असल्याचं सांगताना ऑगस्टपर्यंतच हे सरकार चालणार असल्याचा दावा केला आहे. (Modi government will last till August Claim of RJD leader Lalu Prasad Yadav)

लालू यादव म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार खूपच कमजोर आहे. याच वर्षी ऑगस्टपर्यंतच हे सरकार चालणार आहे. मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं अपिल करतो कारण निवडणुका कधीही लागू शकतात.

दरम्यान, आपल्या वडिलांच्या विधानावर सहमती दर्शवताना म्हटलं की, केंद्र सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाही. कारण नितीश कुमार २०२४ मध्ये किंवा २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्यात यावेळी राजदच राज्यात सरकार बनवेल. थोडी अधिक मेहनत केली तर जास्त जागा आपण जिंकू. यावेळी तेजस्वी यादव यांनी आरोप केला की, आपल्याला १० ते १२ जागांवर हरवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT