देश

चौकीदार चोरी करताना रंगेहाथ पकडला- काँग्रेस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. राफेल व्यवहारामध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला असून मोदी सरकारच्या 36 राफेलची किंमत युपीएच्या 126 विमानांएवढी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. 

काँग्रेसने आज राफेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पत्रकार पऱिषद घेतली. यावेळी सुरजेवाला यांनी चौकीदाराची चोरी पकडली गेल्याचा दावा केला. इंडियन निगोसिएशन टीमनुसार (आयएनटी) 36 राफेल विमानांची किंमत युरो 8460 दशलक्ष डॉलर बनते. आज युरोची किंमत 80 रुपये आहे. तेव्हाचे 75 रुपये युरोमागे पकडले तर ही किंमत जवळपास 63 हजार 450 कोटी रुपये होते. मोदी हीच किंमत 7890 दशलक्ष डॉलर जवळपास 59 हजार कोटी रुपये सांगत आहेत.

36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय 12, 13 जानेवारी 2016 मध्ये अजित डोवालद्वारा फ्रान्समध्ये घेण्यात आला. इंडियन निगोसिएशन टीमने हा निर्णय घेतला नाही. 13 जानेवारीलाच करार करण्यात आला. 2017 मध्ये आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ माजली होती. पंतप्रधानांनी यावर दबाव आणला आणि पंतप्रधान कार्यालयाने कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, आयएनटीच्या अहवालात अंतिम डील आयएनटीने केलीच नसल्याचे म्हटले आहे, असा दावा सुरजेवाला यांनी केला. तसेच जर डोवाल यांनी डील केली तर त्यांना अधिकार होता का? नाही. याचाच अर्थ मोदींच्या प्याद्यांनी हे काम केले. मोदींनी अधिकाराचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. तसेच हा गुन्हा गंभीर असून मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

मोदींनी युपीएच्या काळातील राफेल विमानांची किंमत तब्बल 350 पटींनी वाढविली. युपीए सरकारने राफेल विमानांमध्ये जी प्रणाली विचारात घेतली होती, तीच प्रणाली मोदींच्या राफेल विमानांमध्ये आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. काँग्रेसच्या 126 विमाने खरेदी करताना तंत्रज्ञान हस्तांतरणही नमूद होते. मात्र, मोदींनी 36 विमानांच्या खरेदीमध्ये  तंत्रज्ञान हस्तांतरणालाही बगल दिली आहे. उरलेल्या विमानांनंतर हे हस्तांतरण होणार आहे आणि यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. यातील 10 हजार कोटी रुपये दसॉल्ट कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT