pm-narendra-modi-speach
pm-narendra-modi-speach 
देश

पंतप्रधान मोदींची या चिनी अ‍ॅपला सोडचिठ्ठी; पोस्टही केल्या डिलिट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशात भारत सरकारकडून चीन विरोधात कठोर पाऊलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी सोशल मीडिया अ‍ॅप वीबो वापरणे बंद केले आहे. शिवाय या अकाउंटवर यापूर्वी केलेले सर्व ट्विट त्यांनी डिलिट केले आहेत. उभय देशांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या या कृतीला महत्व प्राप्त झाले आहे. 

बंदी न घातलेल्या PubG आणि Zoom अ‍ॅपचे आहे चीनशी कनेक्शन 
नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वीच वीबोवर अकाउंट काढले होते. आता त्यांचे अकाऊंट पूर्णपणे रिकामे दिसत आहे. यावर मोदींचा फोटो आणि कोणतीही पोस्ट दिसत नाही. त्यामुळे अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलिट केल्याचं दिसत आहे. भारत सरकारने दोन दिवसांपूर्वी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मोदी आता चिनीअ‍ॅप्स वापरणे बंद करत आहेत. 

मोदींच्या वीबो अकाउंटवरुन 2 लाख 44 हजारांपेक्षा अधिक जण त्यांच्याशी जोडले गेले होते. मोदींच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते आणि भारतीय नागरिक वीबो अ‍ॅप सोडत आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्यात आल्याचं दिसत आहे. व्यापारामध्येही चीनला मोठा फटका बसत असल्याचं दिसत आहे. कारण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय राजमार्ग योजनांमध्ये चिनी कंपन्यांना बंदी घातली आहे. तसेच लघू,मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांमध्ये चीनी कंपनी आणि त्यांच्या गुंतवणुकीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे चीनची कोंडी करण्यासाठी भारत आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

भारतीय हवाई दलाची ताकद काय आहे; वाचा सविस्तर
दरम्यान, 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 43 जवान मारले गेल्याचा दावा भारत सरकारने केला होता. या संघर्षानंतर दोन्ही देश आक्रमक झाले आहेत. उभय देशांनी सीमा भागात सैनिकांची जुळवाजुळव सुरु केली आहे. तसेच शस्त्रास्त्रांची आवक सीमा भागात वाढवली आहे. यामुळे दोन्ही देशातील स्थिती स्फोटक आहे. भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब सुरु केला आहे. चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची भारताची तयारी सुरु झाली आहे. चिनी कंपन्यांचे 59 अ‍ॅप बंद करुन भारताने चीनला पहिला झटका दिला आहे. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, यूसी ब्राउझर, शेअरईट या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT