Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : मोदींचे केंद्रातील सरकार अस्थिर ;ममतांचा दावा; ठाकरे, पवारांशी चर्चा

‘केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर आहे,’ असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘खेला शुरू हो गया है !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर आहे,’ असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘खेला शुरू हो गया है ! चलता रहेगा ! असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केली. अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी मुंबईत आलेल्या ममतांनी शुक्रवारी ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या ममतांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची तर सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मातोश्री निवासस्थानी ममता आणि ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘ ममता बॅनर्जी यांची ही भेट कौटुंबिक स्वरूपाची आहे त्या मागेदेखील आल्या होत्या. मोदी यांच्या काळात अनेक गोष्टी बदलत असल्यामुळे अशा भेटी यापुढेही होत राहतील,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींच्या काळातच आणीबाणी

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. यंदा २५ जूनला ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्यासंदर्भातील प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सर्वात जास्त आणीबाणी तर मोदींच्या काळातच लागू करण्यात आली आहे.

आम्ही आणीबाणीचे समर्थन करीत नाही परंतु विरोध करायचा तर भाजपने स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे.’’ विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘ मुंबईत येते तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना भेटते. शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाही भेटत असते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT