mohan bhagwat esakal
देश

Mohan Bhagwat News : राजा देश सांभाळतो पण काही चुकलं तर…; मोहन भागवतांचा रोख कुणाकडे?

रोहित कणसे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे २२ ते २४ जुलै दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्सपोचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भागवत यांनी देशातील मंदिरांवर भाष्य केलं. तसेच त्यांनी सर्वांची चिंता करणारं मदिंर असायला हवं. संकटात मदत, उपासना, शिक्षण, संस्कार देणार आपलं मंदिर असायला हवीत असे भागवत म्हणाले.

आपला समाज राजावर अवलंबून नसतो. समाज लोक त्यांचं काम करत असतात. पण राजाला देश चालवायचा असतो. राजा देश सांभाळतो पण काही चुकलं तर निवडणूकांमधुन त्याला बदल दिसतो असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. वाराणसीमध्ये शनिवारी ३० देशांतील १६०० मंदिरांचे महासंमेलन सुरू झाले. यामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे लॉन्च करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.

मंदिरांविषयी बोलताना भागवत म्हणाले की, मराठीत एक काव्य ऐकलं 'देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर' हे एका व्यक्तीसाठी ठीकच आहे, पण पूर्ण समाजासाठी एक लक्ष ठकवून चालवायचे असेल तर सार्वजनिक स्थान पाहिजे त्यासाठी मंदिर, गुरूद्वारा, विहार, मठ असतात असे मोहन भागवत म्हणाले. मंदिर आपल्या देशात सर्व जणांचे अनिवार्य आवश्यक असणारं आहे. त्यांची नावे वेगेवेगळी आहेत. देह देवाचं मंदिर,आत्मा परमेश्वर असतो. सुख मनात असतं असंही भागवत म्हणाले.

एकतेत सारी विविधता आहे. लोक वेगवेगळी असली तरी सर्व माझे आहेत, हाच विचार मनात असावा. सदाचार असावा, त्याग असावा संयम असावा, असेही त्यांनी सांगितले.

मंदिरात फक्त पूजा होत नाही. जर बाहेर दंगे होते असतील, तर मी शांतीत कसं राहू शकतो. मला बाहेर चाललेले दंगे थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. हे पण महत्वाचे आहे. समाजासाठीही जगायचं असतं आणि तोच धर्म ठरतो असेही भागवत यावेळी म्हणाले. धर्म चक्र चालत राहिलं पाहिजे कारण त्यावर खूप काही चालू असत. निसर्गापासुन मनुष्याचं जीवन सर्व त्यापासून चालत असतं असे भागवत म्हणाले.

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, मंदिरात जाताना स्वच्छ होऊन जायचं. गुरुद्वारात जायच्या आधी हात पाय धुवून जायचं असतं सर्व ठिकाणी ते केल पाहिजे. भारतात खुप आधी पशूंचा बळी दिला जायचा, पण आता नाही दिला जात. काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.

मंदिरातील कर्मचाऱ्यांना पंडितांना प्रशिक्षण हवं, घाई-घाईत काहीही करुन नाही चालणार. कसही मंत्र म्हणून नाही चालणार. काही लोक बाहेरूनच पाया पडून दर्शन घेतात. कळस बघून दर्शन घेतात. मुख्य गोष्ट काय तुमची श्रद्धा टिकून राहिली पाहिजे. पण लोकांनी मंदिरात आले पाहिजे. भक्त आले नाही तर देवांना बघणारे कोण राहणार? नव्या पिढीला मंदिरातुन अनेक गोष्टी समजतात, समजायच्या. संस्कार होतात. नव्या पिढीला आपल्याला हे सर्व मंदिरापासून द्यायचं आहे. कारण त्यांना पुढे सर्व सांभाळायचं आहे. त्यामुळे त्यांना ही शिकवण दिली पाहिजे त्यांच्यासाठी उपक्रम राबवले पाहिजेत, असेही भागवत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT