Mohan Charan Majhi  sakal
देश

Mohan Charan Majhi : ओडिशात प्रथमच भाजपराज;मोहनचरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

तब्बल चारवेळा आमदार म्हणून निवडून येणारे आदिवासी नेते मोहनचरण माझी यांनी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

प्रशांत पाटील

भुवनेश्वर : तब्बल चारवेळा आमदार म्हणून निवडून येणारे आदिवासी नेते मोहनचरण माझी यांनी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच भाजप नेते ठरले आहेत. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री आणि विविध भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

येथील जनता मैदानात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रघुवरदास यांनी माझी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. के.व्ही.सिंह देव, प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

ओडिशामध्ये सरकार स्थापन करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ आहे. हा सोहळा भव्यदिव्य ठरावा म्हणून संघटनेकडून प्रयत्न करण्यात आले होते. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त जे.पी.नड्डा, अमित शहा, राजनाथसिंह, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव आणि अन्य नेते मंडळी उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT