Molestation of a woman by BJP corporator Molestation of a woman by BJP corporator
देश

महिलेने खिडकी उघडताच जागतो भाजप नगरसेवकाचा सैतान; करतो अश्लील हावभाव

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमधील उदयपूरमध्ये विवाहित महिलेने भाजपच्या नगरसेवकावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नगरसेवकाने विनयभंग (Molestation of a woman) केला आणि अश्लील हावभाव केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावर महिलेने नगरसेवकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी नगरसेवकाचे दुकानही विवाहित महिलेच्या घरासमोर आहे. महिलेचा आरोप आहे की, विरोध केल्यावर तो शिवीगाळ करतो आणि भांडण करतो. (Molestation of a woman by BJP corporator)

विवाहित महिलेचे नगरमध्ये तीन मजली घर आहे. घराची स्वयंपाकघराची खिडकी ज्या बाजूला उघडते त्याच्या समोरच नगरसेवक दिलीप खाटीक यांचे मांसाचे दुकान आहे. जेव्हा ती खिडकी उघडते तेव्हा नगरसेवक अश्लील हावभाव करतात. नकार दिल्यास शिवीगाळ आणि जातिवाचक प्रकरणात गोवण्याची धमकीही दिली, असा आरोप महिलेने केल्याचे एएसआय पुंजीलाल मीना यांनी सांगितले.

एक दिवसापूर्वी नगरसेवक (BJP corporator) दिलीप खाटीक याने महिलेचा विनयभंग (Molestation of a woman) केला होता. विरोध केल्यावर विवाहितेचा पतीही आला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. नगरसेवक पाठलाग करतो आणि अनपेक्षित कमेंटही करतो. नगरसेवकाच्या अशा कृत्यांमुळे ती घरात कैद होऊन जगत आहे. हवेसाठी खिडक्या आणि दरवाजे देखील उघडू शकत नाही. स्वयंपाकघरात अन्न शिजविणेही कठीण झाले आहे. खूप सहन केल्यानंतर पोलिस ठाणे गाठायचे ठरवले, असे महिलेने सांगितले.

घटनास्थळाची पाहणी केली आहे. विवाहितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात विवाहितेचा जबाब नोंदवल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आरोपी हा साळुंबर येथील प्रभाग १५ मधील भाजपचा नगरसेवक आहे. तो भाजप (BJP) अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे, असे प्रकरणाचा तपास करीत असलेले एएसआय पुंजीलाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT