Delhi HC Today grants bail to Karti Chidambaram in INX Media case
Delhi HC Today grants bail to Karti Chidambaram in INX Media case 
देश

कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ; कोर्टने फेटाळला अटकपूर्व जामीन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : व्हिसा घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका बसला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि अन्य दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यापूर्वी, न्यायालयाने चिनी व्हिसा लाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

ईडीने न्यायालयासमोर सांगितले की, जर कार्तीला अंतरिम जामीन मंजूर झाला तर, एजन्सी हे पैसे कुठे गेले हे शोधू शकणार नाही. ईडीने असेही म्हटले आहे की, कार्तीची याचिकेवर सध्याच्या स्थितीत सुनावणी योग्य नसल्याचेही म्हटले असून, अंतरिम जामीन मंजूर झाल्यास तपासावर परिणाम होईल असे मत ईडीने न्यायालयात मांडले.

मागील काही दिवसांपूर्वी कार्ति चिदंबरम (karti chidambaram) यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवर सीबीआयने धाड टाकली होती. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आज ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर चीनी नागरिकांना व्हिसा पुरवल्याच्या घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला आहे.

चिदंबरम यांच्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणला व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं अटक केली होती. दरम्यान, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भास्कर रमन यांची चौकशी करताना त्यांना ताब्यात घेतलं होतं. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT