Money will recovered from corrupt leaders Union Home Minister amit Shah Chhattisgarh meeting politics sakal
देश

Amit Shah : भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जातील; छत्तीसगडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची ग्वाही

छत्तीसगडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची ग्वाही; दोषींना कठोर शिक्षा करणार

सकाळ वृत्तसेवा

राजनांदगाव : आगामी निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकार पुन्हा आले तर काँग्रेस पुन्हा राज्यात लांगुलचालन आणि मतपेढीचे राजकारण करेल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी भाकीत केले.

राजनांदगाव शहरात आयोजित सभेत बोलताना शहा म्हणाले, काँग्रेसच्या सरकारने एखाद्या हॉटेलच्या साखळीप्रमाणे दिल्लीपर्यंत एक भ्रष्टाचाराची साखळी तयार केली आहे. मात्र छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांना उलटे टांगले जाईल, असाही इशारा दिला. छत्तीसगड येथे दोन टप्प्यांत ९० जागांसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, या राज्याची निर्मिती तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केल्याची आठवण छत्तीसगडवासीयांना करून देण्यासाठी आपण आलो आहोत. काँग्रेसच्या काळात पूर्वीचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे बिमारू राज्यांच्या श्रेणीत यायचे. मात्र डॉ. रमणसिंह नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंधरा वर्षात बिमारू राज्य विकसित करण्याचे काम केले.

छत्तीसगडची जनता काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे आणि तिने आता भाजपला सत्ता मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. शहा यांनी बेमेतरा जिल्ह्यातील बिरानपूर गावात झालेल्या धार्मिक दंगलीवरून भूपेश बघेल सरकारला धारेवर धरले.

छत्तीसगड पुन्हा धार्मिक दंगलीचे केंद्र व्हावे का? असा सवाल त्यांनी केला. बिरनपूर दंगलीत भुवनेश्‍वर साहू यांची हत्या झाली होती. त्यामुळे भुवनेश्‍वर साहू यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याचे भाजपने ठरविले असून त्यांचे वडील श्री ईश्‍वर साहू यांना उमेदवारी दिली असल्याचे शहा यांनी सांगितले.

भूपेश बघेल सरकारने छत्तीसगडला काँग्रेसच्या दरबारातील ‘एटीएम’ केले आहे. छत्तीसगडच्या आदिवासी तरुणांच्या हक्काचा पैसा, मागासवर्गीयांतील तरुण भावंडांचा हक्कांचा पैसा दिल्ली दरबारच्या तिजोरीत जात असल्याचा दावा शहा यांनी केला.

आगामी निवडणूक ही एखादे सरकार किंवा आमदारांना निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोनेरी भवितव्य साकारण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

गणेश राम भगत यांच्या समर्थकांचे आंदोलन

रायपूर ः छत्तीसगडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश राम भगत यांच्या कार्यकर्त्यांनी, जशपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी करत रायपूर येथील पक्षकार्यालयात समोर आंदोलन केले.

छत्तीसगडमधील जसपूर येथील विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक कुमार भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. भाजपच्या वतीने या मतदार संघात राईमुनी भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राईमुनी यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘गणेश राम भगत यांच्यासारख्या नेत्यांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली. गणेश राम भगत हे आदिवासींच्या हक्कांसाठीच्या चळवळीमंध्ये कायमच अग्रेसर असतात, या उलट राईमुनी यांचे कोणतेही विशेष योगदान नाही,’ असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT