monkeypox Marathi News monkeypox Marathi News
देश

चिंता वाढवणारी बातमी! केरळमध्ये आणखी एकाला मंकीपॉक्सची लागण; ५ वे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केरळमध्ये मंकीपॉक्सचे (Monkeypox) आणखी एक प्रकरण समोर आले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली. मलप्पूरममध्ये ३० वर्षीय तरुणावर उपचार सुरू आहे. हा तरुण २७ जुलै रोजी यूएईहून (UAE) कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीअंती त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समजते. देशातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. (monkeypox Latest News)

केरळमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षण असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर काल म्हणजे दोन दिवसांनी त्याचे नमुने मंकीपॉक्स (Monkeypox) पॉझिटिव्ह आले. त्यामुळे चिंता वाढली आहे. या २२ वर्षीय व्यक्तीचा ३० जुलै रोजी मृत्यू झाला होता. तो नुकताच यूएईतून (UAE) परतला होता. या रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (NIV) तपासणीसाठी पाठवले होते.

केरळ (Kerala) राज्यात मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी केरळमध्ये आणखी एक मंकीपॉक्स प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यूएईमधून परतलेल्या व्यक्तीची आज सकारात्मक चाचणी झाली. राज्यातील हा विषाणूजन्य आजाराचा आतापर्यंतचा पाचवा रुग्ण आहे. त्याच्यावर मलप्पूरममधील मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे.

राजधानी दिल्लीत सोमवारी मंकीपॉक्सची दुसरी घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकन वंशाच्या एका नागरिकाला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी संशय आल्याने उपचारासाठी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. रविवार व सोमवारी देखील आफ्रिकन वंशाच्या संशयितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT