Monkeypox would be an epidemic Fear of WHO statement Monkeypox would be an epidemic Fear of WHO statement
देश

मंकीपॉक्स महामारी ठरेल? डब्ल्यूएचओच्या वक्तव्याने भीती

सकाळ डिजिटल टीम

कोरोना अजून संपलेला नाही आणि मंकीपॉक्सने (Monkeypox) जगातील अनेक देशांमध्ये खळबळ माजवली आहे. आतापर्यंत मंकीपॉक्सच्या २१९ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. जी २० देशांमध्ये पसरली आहे, असे युरोपियन युनियनच्या रोग एजन्सीचे म्हणणे आहे. अशात येत्या काही दिवसांत हे प्रकरणे वाढू शकतात असा इशारा डब्ल्यूएचओने (WHO) दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे की, कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्स महामारी सिद्ध होणार नाही. मात्र, डब्ल्यूएचओ (WHO) या प्रकरणी मौन बाळगून आहे. (Monkeypox would be an epidemic Fear of WHO statement)

मंकीपॉक्सची (Monkeypox) जगातील पहिली मानवी केस १९७० मध्ये आढळली. यावर्षी पुन्हा एकदा मंकीपॉक्सने युरोपीय आणि आफ्रिकन देशांमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील ११ देशांसह २० देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे देशात एकही रुग्ण समोर आलेला नाही.

२०२० मध्ये जगाने प्रथमच कोरोना महामारीचे नाव ऐकले. या कोरोनाने कोट्यवधी लोकांचा बळी घेतला. कोरोनाचे (Corona) जगातून अद्याप समूळ उच्चाटन झालेले नाही. अशात मंकीपॉक्सच्या (Monkeypox) दस्तकाने जगासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या विकसित देशांमध्येही मंकीपॉक्सचा प्रसार झाला आहे. हा रोग महामारी बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, हा कोरोनासारखा संसर्गजन्य नाही, असा दावा यूएस आरोग्य तज्ञांनी केला आहे.

भारतातील एकही केस नाही, पण सावध आहे

मंकीपॉक्सचा (Monkeypox) संसर्ग युरोप, अमेरिका आणि इतर स्थानिक नसलेल्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. मात्र, भारतात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. भारत या संसर्गाचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा मुखर्जी यांनी सांगितले. उच्च ताप, मोठ्या लिम्फ नोड्स, शरीरात दुखणे, पुरळ आदी असामान्य लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे. विशेषत: मंकीपॉक्सग्रस्त देशांमध्ये प्रवास करून आलेल्या लोकांवर, असेही मुखर्जी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT