Monsoon
Monsoon 
देश

मॉन्सूनची अंदमान व्यापून अरबी समुद्रात चाल; मालदिवपर्यंत मजल

सकाळवृत्तसेवा

पुणे : गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेस मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.  

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. त्यांनतर मॉन्सूनने कोणतीही वाटचाल केलेली नाही. अखेर आज मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.

सर्वसाधारणपणे केरळात १ जूनला मॉन्सून दाखल होण्याचे संकेत असतात. काही वेळा तो आधी तर काही वेळा नंतरही दाखल होतो. यंदाही मॉन्सून पाच दिवस उशिरा दाखल होईल. यातही चार कमी-अधिक दिवसांची तफावत धरली जाते. आगमन उशिर होण्यात स्थानिक स्थितीतील हवामानातील बदलांचा सतत होणार प्रभाव मॉन्सून मार्ग प्रभावित करत असतो, यामुळे मॉन्सूनच्या निर्धारित तारखेपेक्षा कालावधीत फरक पडतो.

मॉन्सूनचे आगमन
वर्ष---- आगमन

२०१४ -- ६ जून
२०१५ -- ५ जून
२०१६ -- ८ जून
२०१७ --३० मे
२०१८ - २९ मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT