Monsoon 
देश

केरळ किनारपट्टी मॉन्सूनने व्यापली; दोन दिवसांत येतोय महाराष्ट्रात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य व्यापले आहे. बंगालच्या उपसागरात मोठा टप्पा गाठत ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. १३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोचण्याची शक्यता आहे. 

रविवारी (ता. ९) दुपारनंतर राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. मृगसरींनी जोरदार सलामी दिल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीला वेग येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सांयकाळी जोरदार पाऊस पडला, जिल्ह्याच्या धरण परिसरातही चांगल्या सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्यातही झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले भरून वाहिले, तर ऊस पिकाचे नुकसान झाले. सांगली मिरजेसह जिल्ह्यातील पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यांत पावसासह गारा पडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात चिपळूण तालुक्यासह खेड, दापोली, गुहागर आणि संगमेश्‍वर तालुक्यांत झालेल्या पावसाने धूळपेरण्या केलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांत रविवारी रात्री चांगला पाऊस झाला. अकोले येथे सर्वाधिक ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

दरम्यान मॉन्सूनचा प्रवास अडखळत सुरू असून, यंदा तब्बल आठवडाभर उशिराने शनिवारी (ता. ८) केरळात आगमन झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १०) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह, लक्षद्वीप बेटांचा उर्वरित भाग, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केली. केरळमधील कन्नूर आणि तामिळनाडूमधील मदुराईपर्यंत मॉन्सून दाखल झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह ईशान्य भारतातील मिझोराम, मणिपूर राज्यांपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

अरबी समुद्रात वादळाचे संकेत 
लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्राची तीव्रता वाढली आहे. मंगळवारपर्यंत (ता. ११) अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत. उत्तरकडे सरकत जाणारे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र, केरळच्या किनाऱ्यावर समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT