lok sabha
lok sabha 
देश

मध्यरात्रीपर्यंत चाललं लोकसभेचं कामकाज, 4 विधेयकांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. तर दुसरीकडे लोकसभेचं कामकाज मात्र शांततेत पार पडलं. मध्यरात्रीपर्यंत सुरु राहिलेल्या कामकाजात चार विधेयकांना मंजूरी देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांच्या संमतीनंतर शून्य प्रहराच्या कामकाजाला सुरुवात केली. यावेळी 88 सदस्यांनी जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले. लोकसभेत मंजुर झालेल्या विधेयकांमध्ये मंत्र्यांचे वेतन आणि भत्ता (सुधारीत) विधेयक 2020 मंजुर झाले. याअंतर्गत कोरोनाच्या संकटकाळात खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये 30 टक्के कपातीची तरतूद केली आहे. हे विधेयक राज्यसभेत 18 सप्टेंबरला मंजुर झालं होतं. 

लोकसभेचं कामकाज रात्री 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत चाललं. यावेळी याशिवाय द बायलॅटरल नेटिंग ऑफ क्वालिफाइड फायनान्शिअल कॉन्ट्रॅक्ट्स बिल 2020, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी बिल 202 आणि द नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी बिल 2020 ही विधेयके मंजुर करण्यात आली. कामकाजाला सुरुवात होण्यास एक तास उशिर झाला मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा 5 तास 36 मिनिटं जास्त वेळ सुरू राहिलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचं कामकाज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित केलं. 

विधेयकांना मंजुरी देण्याआधी लोकसभेत कोरोनावर पुन्हा एकदा चर्चा झाली. ओम बिर्ला यांनी सुरुवातीला यावर भाषण केलं. कोरोनावर चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटलं की, देशात कोरोनाची परिस्थिती जगाच्या तुलनेत खूपच वाईट आहे. आपल्याला ना कोरोनाचा संसर्ग रोखता आला ना अर्थव्यवस्था सांभाळता आली. गेल्या 41 वर्षांत पहिल्यांदाच जीडीपी मायनसमध्ये गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कोरोनावर चर्चेवेळी कोरोना व्हॅक्सिनबाबत आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी संसदेत माहिती दिली. देशात चारपेक्षा जास्त कोरोना व्हायरस व्हॅक्सिनची प्री क्लिनिकल ट्रायल सध्या अॅडव्हान्स स्टेजमध्ये आहे. भारतात आम्ही सर्व 30 व्हॅक्सिन कॅडिडेटच्या टेस्टिंगमध्ये पूर्ण सहकार्य केलं. यातील तीन व्हॅक्सिन फेज 1, फेज2, फेज 3 च्या अॅडव्हान्स ट्रायलमध्ये आहे. चारपैकी जास्त व्हॅक्सिन प्री क्लिनिकल ट्रायलच्या अॅडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT