Monsoon Season Meteorological Department esakal
देश

Monsoon Season : जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रात काय असणार मॉन्सूनची स्थिती? IMD चा नवा अंदाज समोर

मॉन्सूनची वाटचाल (Monsoon Season) थांबल्याने पावसातही खंड पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा (Maharashtra Rain) काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे.

पुणे : मॉन्सूनची वाटचाल (Monsoon Season) थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) जाहीर केला आहे.

मात्र उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा (Maharashtra Rain) काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे. जूनमध्ये देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (९२-१०८ टक्के) अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता.

मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

नैॡत्य मोसमी वारे यंदा १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाले. रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने सहा दिवस आधीच मोसमी वारे पूर्वोत्तर राज्यांत दाखल झाले. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) दाखल झालेल्या मॉन्सूनने अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत १२ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात मजल मारली. पूर्व भारतात ३१ मेनंतर आणि महाराष्ट्रात १२ जूननंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली असून तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो.

‘ला-निना’ची जुलैमध्ये शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आले आहे. या भागात जुलै महिन्यात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यांत ‘ला-निना’ तयार होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. हिवाळ्यातही ही स्थिती कायम राहणार असून, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात ‘ला-निना’ची शक्यता सर्वाधिक ८५ टक्के असल्याचे नोवा या अमेरिकन हवामान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Dairy Kolhapur : गोकुळच्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून शाब्दिक चकमक; बाबासाहेब चौगले, अंबरीश घाटगे, चेतन नरकेही म्हणाले आम्ही ५ वर्षे बसलोय...

SMAT 2026: वैभव सूर्यवंशीचा कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड! पण, संघ नाही जिंकला; वाचा बिहारचा कोणी करेक्ट कार्यक्रम केला

Bus Accident: चालकाला डुलकी; ट्रॅव्हल्स बस पुलाचा कठडा तोडून दहा फूट खोल नालीत! ;अपघातात एकाचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी;

Latest Marathi News Live Update: ६१ वर्षीय वृद्धाचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू

Pimpalgaon Joga Dam: पिंपळगाव जोगा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू; शेतकऱ्यांना दिलासा;धरणात ८० टक्के पाणीसाठा; १ जानेवारीपर्यंत पाणी सुरू राहणार; रब्बी पिकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT