Monsoon session adjournment issue of inflation PM narendra modi election delhi sakal
देश

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावर गदारोळ, कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होण्यापूर्वी आधी प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधून सर्व पक्षांना अधिवेशन काळात सहकार्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सकारात्मक पद्धतीने व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असले तरी पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावर कॉंग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होण्यापूर्वी आधी प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधून सर्व पक्षांना अधिवेशन काळात सहकार्याचे आवाहन केले. या अधिवेशनात होणाऱ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा दाखला देत मोदी म्हणाले, की या कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती आणि नवे उपराष्ट्रपती आणि त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. संसद संवादाचे खुले सक्षम माध्यम आहे. वेळ आल्यास वादविवाद होतात. एखाद्या गोष्टीवर व्यापक चर्चा होऊन बारकाईने केले जाणाऱ्या विश्लेषणाचे धोरण ठरविताना आणि निर्णय करताना सकारात्मक योगदान ठरू शकते.

कामकाज सुरू झाल्यानंतर कॉंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरू असल्याचे सांगत कामकाज सुमारे दीड तासासाठी तहकूब केले. दुपारी दोनला सभागृह पुन्हा सुरू होताच महागाईच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजीला सुरवात केली. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी या विरोधाला पाठिंबा व्यक्त केला. त्यात राजस्थानचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने केल्यामुळे गदारोळ झाला.

सिन्हा, लोधी यांनी घेतली शपथ

लोकसभेचे कामकाज सुरू होताच पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या विविध राज्यांतील प्रतिनीधींना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), दिनेश लाल यादव निरहुआ (आझमगड) आणि घनश्यामसिंह लोधी (रामपूर) यांनी शपथ घेतली. संगरूरमध्ये विजयी झालेले शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजितसिंग मान यांनी ओम बिर्ला यांच्या कार्यालयात शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: उपराष्ट्रपतीसाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या, मुख्यमंत्र्यांचा मला फोन, खुलासा करत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Dada Bhuse : शालेय शिक्षणात ‘राष्ट्र प्रथम’ची संकल्पना; शिक्षणातून उद्याच्या भारताचा नागरिक घडणे आवश्यक

Live in relationship: प्रियकराने मृतदेहाचे केले सात तुकडे; पाय अन् डोके गायब; 'लिव्ह-इन'मुळे दुर्दैवी अंत!

VIRAL VIDEO: शिक्षिकेचा भन्नाट अंदाज! गाण्याच्या तालावर शिकवला मुलांना 'गुड टच-बॅड टच' धडा! कसा ते एकदा बघाच! व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Hartalika 2025 : यंदाची हरतालिका ठरणार या राशींसाठी शुभ, गौरी-शंकराची होणार कृपा !

SCROLL FOR NEXT