Monsoon Session Latest Marathi News Monsoon Session Latest Marathi News
देश

Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; महागाई व जीएसटीवरून गदारोळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महागाई व जीएसटी दरवाढीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विविध मुद्यांवर विरोधी सदस्यांनी केलेला गदारोळ आणि आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १८) सुरू झाल्यानंतर तासाभरातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

काँग्रेसचे अनेक सदस्य आसनाजवळ आले आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. महागाईसह विविध मुद्द्यांवर ते सरकारला जाब विचारत होते. व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आणि सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

यावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्णय घेतल्याचे दिसते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना मतदान करता यावे, यासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याचे व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना शपथ देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यानंतर नायडू म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. यावेळी प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले. हे अधिवेशन सार्थक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT