देश

आला रे, केरळमध्ये मॉन्सून आला; यंदा वरुणराजाची हजेरी दमदार राहणार 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशभरातील वातावरण कोरोनामय झालेले असताना मॉन्सूनच्या वेळापत्रकात मात्र बदल झालेला नाही.केरळमध्ये आजपासून (ता.१) मॉन्सून अधिकृतपणे दाखल झाला असून यंदा वरुणराजाची हजेरी संपूर्ण देशभरात दमदार म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त (१०२ टक्के) राहील. शेतीसाठी महत्त्वाचा महिना असलेल्या जुलैमध्ये १०३ टक्के पाऊस असेल. ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचा विस्तार चांगला असेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्याने आज जाहीर केला. 

हवामान खात्याने एप्रिलमध्ये जाहिर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मॉन्सून सरासरी इतका म्हणजे १०० टक्के यंदा होईल, असे भाकित वर्तविले होते. आता त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन आणि हवामान खात्याचे महासंचालक महापात्रा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सुधारित अंदाज जाहीर केला. आधुनिक मॉडेलद्वारे केलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन मॉन्सून १०२ टक्के असेल. यात चार टक्क्यांची घट अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशभरात पावसाचा विस्तार चांगला असेल. उत्तर हिंदुस्थानात (वायव्य पट्टा) १०७ टक्के, मध्य भारतात १०३ टक्के, दक्षिण भारतात १०२ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. परंतु ईशान्य भारतात ९६ टक्के असा कमी पाऊस राहू शकतो, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. अर्थात त्यात आठ टक्के कमी अधिक प्रमाण होऊ शकते. कृषीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुलैमध्ये १०३ टक्के तर ऑगस्टमध्ये ९७ मॉन्सून होईल. चांगल्या मॉन्सूनसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ला निना या प्रशांत महासागरातील समुद्री प्रवाहाच्या अनुकूलताही महत्त्वाची ठरणार आहे. तर चांगल्या पावसाची शक्यता ४१ टक्के असेल. 

कोझिकोड, तिरुअनंतपूरम येथे मुसळधार 
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मागील दोन दिवस केरळमध्ये पाऊस झाला होता. मात्र आज औपचारिकरित्या केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे, अशी घोषणाही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. केरळमधील १४ पाऊस मोजणी केंद्रांपैकी ८० टक्के केंद्रांवर २ मिलीमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. कोझिकोड, तिरुअनंतपूरम येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ९ सेंटिमीटर आणि ६ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon News : वनविभागाच्या अडथळ्यांमुळे रखडलेले आंबेगाव पूर्व भागातील रस्ते; जुन्नर येथे शिष्टमंडळाची निर्णायक बैठक; तोडग्याचे आश्वासन!

पाहायला मिळणार अस्सल अदाकारी! हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Mumbai News: नववर्ष २०२६ पूर्वी मुंबईत बीएमसीचा फायर अलर्ट! कडक निर्बंध लागू; नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय? वाचा...

Hidden Camera in Hotel: हॉटेल रुममध्ये असलेले छुपे कॅमेरे कसे ओळखायचे? ...नाहीतर तुमच्या खासगी क्षणांचा येईल सिनेमा

ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे.... ‘केस नं. ७३’ मध्ये उलगडणार मुखवट्यामागील रहस्य; दिसणार हे कलाकार

SCROLL FOR NEXT