Monsoon Update Sakal
देश

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

राज्यात आज वादळी पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Weather Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अरबी समुद्रातील शाखेच्या प्रगतीस अनुकूल वातावरण तयार झाल्याने त्याने दक्षिण कर्नाटकात रविवारी सलामी दिली. आंध्र प्रदेशासह बंगाल उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला मॉन्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजी आगमन केल्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच (ता. ३०) मॉन्सून डेरेदाखल झाला. त्यानंतर उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची प्रगती सुरूच होती.

मॉन्सूनने रविवारी अरबी समुद्रातील वाटचाल पुन्हा सुरू केली. संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगलूरू, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूरपर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली आहे. बंगाल उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे.

पुढील वाटचालीस पोषक हवामान

पुढील दोन दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा आणखी काही भाग, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.

राज्याला नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) आगमनाचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यासह १५ जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता. ३) वादळी वाऱ्यासह वळिवाच्या सरी कोसळतील, असा ‘येलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत. यातच उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भ होरपळत आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका असह्य होत असून, उकाडा त्रासदायक ठरत आहे. विदर्भात उन्हाची लाट कायम आहे.

राज्यात यवतमाळ येथे सर्वाधिक म्हणजे ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे नोंदले गेले आहे. सोमवारी उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. राज्याच्या दक्षिणेकडील भागात सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत आहेत. यावरून मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये, तसेच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह सोमवारी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३६.६, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर २८.५, मालेगाव ४२.४, नाशिक ३६, सांगली ३७.३, सातारा ३६, सोलापूर ४०.६, सांताक्रूझ ३५.२, रत्नागिरी ३४.८, छत्रपती संभाजीनगर ३९.५, नांदेड ४१.२, परभणी ४०.५, अकोला ४२.८, अमरावती ४२.६, बुलडाणा ३८.२, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ४३.४.

उष्ण, दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT