Monsoon In Kerala 2024 ESakal
देश

Monsoon 2024: काय म्हणता? यावर्षी पाऊस थांबणार नाही? हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी सांगितली धडकी भरवणारी माहिती

India Meteorological Department: भात, कापूस, सोयाबीन, मका आणि डाळी या पिकांची काढणी सप्टेंबरच्या मध्यामध्ये केली जाते. पाऊस कोसळत राहिला तर काढणी होणार नाही. पुढचं पीक जे हिवाळ्यात पेरलं जातं त्याला मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. कारण जमिनीमध्ये ओल कायम असणार आहे.

संतोष कानडे

Rain updates: यावर्षी मान्सन वेळेवर आला आणि पाऊसकाळही चांगला सुरु आहे. परंतु हा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, लो प्रेशर सिस्टीममुळे मॉन्सून माघारी जाण्याची वेळ लांबली आहे.

भात, कापूस, सोयाबीन, मका आणि डाळी या पिकांची काढणी सप्टेंबरच्या मध्यामध्ये केली जाते. पाऊस कोसळत राहिला तर काढणी होणार नाही. पुढचं पीक जे हिवाळ्यात पेरलं जातं त्याला मात्र फायदा होण्याची शक्यता आहे. कारण जमिनीमध्ये ओल कायम असणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रेशर सिस्टम बनत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरु होईल. भारत देश हा गहू, साखर आणि तांदूळ उत्पादनात जगातला दुसरा मोठा देश आहे. सध्याच्या हवामानामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कमोडिटी एक्स्पोर्टमध्ये अडचणी आहेत. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

मान्सून जूनमध्ये सुरु होतो तर १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतु यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून बरसेल, असं दिसून येत आहे. भारतात मान्सून वर्षाला पाण्याच्या गरजेच्या ७० टक्के वाटा घेऊन येतो. यामुळे शेती हिरवीगार होते, तलावं भरली जातात, अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी मान्सूनवर अवलंबून आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधला पाऊस हा ला-नीना वेदर सिस्टीममुळे पडत असतो. त्यामुळे यावर्षी मान्सूच्या परतीच्या प्रवासाला उशीर होणार आहे. संपूर्ण देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात सात टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. काही राज्यांमध्ये सरासरीच्या ६६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. जर सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाला तर त्याचा परिणाम पिकांवर होणार आहे. त्याचा परिणाम थेट महागाईवर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT