coronavirus 
देश

तिसऱ्या दिवशी भारतामध्ये २० हजारांहून अधिक रुग्ण;आत्तापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद 

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्याला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउन शिथिल केल्यानंतर देशभरातील बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ होत असून देशभरात कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात २४,८५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

लागोपाठ तिसऱ्या दिवशी देशात २० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख ७३ हजार १६५ इतकी झाली आहे. तर, आत्तापर्यंत एकूण १९ हजार २६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात करोनाच्या २ लाख ४६ हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, आत्तापर्यंत ४ लाख ९ हजार ७८३ जण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी अनेक राज्यांमध्ये करोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. 

आत्तापर्यंत ९७ लाख ८९ हजार ६६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ४८ हजार ९३४ जणांची करण्यात आली असल्याची माहिती आयसीएमआरने रविवारी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत रशियाला मागे टाकणार 
लागोपाठ तिसऱ्या दिवशी भारतामध्ये २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून भारतात रशियापेक्षा केवळ ५ हजार ७९८ रुग्ण कमी असून रविवारी जरा भारतात पुन्हा २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले तर भारत रशियाला मागे टाकून सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT