corona death
corona death esakal
देश

Corona: जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) त्रस्त झाले असून, यामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना कायमचे गमावले आहे. भारतात देखील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून, कोरोनामुळे जगभरातील 88 देशांमध्ये स्थलांतरीत झालेल्या जवळपास 4,355 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत दिली आहे. (Worldwide Indian Migrants Death Due Corona)

मुरलीधरन म्हणाले की, जगभरातील 88 देशांमध्ये कोविडमुळे 4,355 भारतीय स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. यात सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक 1,237 स्थलांतरीतांचा मृत्यू झाला. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये 894 भारतीयांचा मृत्यू झाला असून, कुवेतमध्ये 668, ओमानमध्ये 555 आणि बहरीनमध्ये 203 भारतीय स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. ( Indian Migrants Death Due Corona In Saudi Arabia)

कोरोनाकाळात 25 हजारांहून अधिक भारतीयांची आत्महत्या

कोरोना काळात बेरोजगारीला कंटाळून किंवा कर्जबाजारीला कंटाळून जवळपास 25 हजार भारतीयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी (दि.9) ही माहिती दिली.

राय म्हणाले की, ही आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे प्रदान केलेल्या डेटावर आधारित असून, 2018-2020 मध्ये बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेकांना आयुष्य संपल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. 25 हजारांपैकी 16 हजार आत्महत्या या बेरोजगारी या एकाच कारणामुळे झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. (NCRB Report About suicide During Corona Period)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT