Most deaths due to snake bites in Odisha sakal
देश

ओडिशात सर्पदंशामुळे सर्वाधिक मृत्यू

नैसर्गिक आपत्तीपेक्षाही संख्या जास्त; मे ते ऑक्टोबरमध्ये ८५ टक्के प्रमाण

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्‍वर : पूर, चक्रीवादळ अशी नैसर्गिक आपत्ती ओडिशावर सतत कोसळत असते. त्यात जिवीत हानीही होत असते. पण अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा राज्यात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात दरवर्षी ९०० जणांचा मृत्यू सर्पदंशाने होतो, अशी माहिती विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्पदंश ही ‘राज्य विशिष्ट आपत्ती’ असल्याचे ओडिशा सरकारने १ एप्रिल २०१५मध्ये जाहीर केलेले आहे. अशी घोषणा करणारे हे देशातील पहिले राज्य आहे.

साप चावून मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची भरपाई दिली जाते. साप चावून माणूस दगावण्याचे प्रमाण २०१५ -१६ मध्ये ५२० होते. मृतांची ही संख्या वाढत असून २०२०-२१ ७७५ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ओडिशात अन्य आपत्तीतील मनुष्यहानीपेक्षा सर्पदंशाच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१५ ते २०२१ या काळात ३० जिल्ह्यांमध्ये पाच हजार ९६४ सर्पदंशांचे मृत्यू नोंदविले आहेत. वर्षभरात सरासरी ८२५ जणांना साप चावल्याने जीव गमवावा लागला आहे.

मे ते ऑक्टोबर या काळात साप चावण्याच्या घटना वाढल्याचे दिसून आले आहे. सहा महिन्यात हे प्रमाण ८५ टक्के आहे. सर्पदंशाच्या मृत्यूचा चढता आलेख पाहता यात घट होण्यासाठी राज्य सरकारने संस्थात्मक क्षमता निर्माण करून प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विषविरोधी औषधांचा पुरेसा साठा असणे व साप चावलेल्या व्यक्तींना वेळेवर रुग्णालयात आणून उपचार मिळण्यामुळेही मृतांच्या संख्येत मोठी घट होऊ शकते.

मृत्यू होण्याची कारण

  • वैद्यकीय सुविधांचा अभाव

  • आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष

  • रुग्णांना तांत्रिकाकडे घेऊन जाण्याचा कल

  • जादूटोण्याने रुग्ण बरे होण्याची अंधश्रद्धा

- स्मृती सागरिका-कानुनगो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT