farmer protest esakal
देश

कृषी कायद्यांना बहुतांश संघटनांचं होतं समर्थन; समितीचा अहवालाचा

वर्षभरापूर्वी न्यायालयात सादर करण्यात आलेला अहवान सोमवारी सार्वजनिक करण्यात आला.

सुधीर काकडे

दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर वर्षभरानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले. मात्र या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल समोर आल्याने सध्या पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या काही महिन्यांपूर्वीच या समितीनं एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार कायदे मागे घेण्याच्या विरोधात समितीने शिफारस केली होती. बहु संख्य शेतकरी संघटना या कायद्यांना समर्थन हेत आहेत. त्यामुळे कायदे मागे घेणं हे अशा संघटनांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे असं या समितीने म्हटलं होतं. वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर केला गेलेला अहवाल सोमवारी सार्वजनिक करण्यात आला.

समितीच्या तीन सदस्यांपैकी एक असलेले अनिल घनवट यांनी सोमवारी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत हा 92 पानांचा अहवाल जाहीर केला. समितीचे अन्य दोन सदस्य कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि डॉ परमोद कुमार जोशी हे मात्र यावेळी उपस्थित नव्हते.

दरम्यान, समितीला मिळालेल्या माहितीचा दाखला देत अहवालात असं म्हटलं आहे की, “समितीने केलेल्या गोळा केलेल्या डेटामधून असं दिसून आलं आहे की, केवळ 13.3 टक्के शेतकरी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात होते. तर तब्बल 3.3 कोटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे 85.7 टक्के शेतकरी संघटनांनी कायद्याचं समर्थन केलं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

नवी मुंबई एअरपोर्टचा मोठा धमाका! ४६ नव्या शहरांसाठी उड्डाणांची घोषणा; उन्हाळी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या मार्ग...

Latest Marathi News Live Update : ऋषी वैद्य यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

SCROLL FOR NEXT