देश

Amritpal Singh Arrested : "वाघाप्रमाणे आत्मसमर्पण केले, आम्हाला त्याचा अभिमान", अमृतपाल सिंगच्या आईची प्रतिक्रिया!

Sandip Kapde

Amritpal Singh Arrested : वारिस पंजाब दे चा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंग याला पोलिसांनी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक केली आहे. खलिस्तान समर्थक अमृतपाल जवळपास ३५ दिवसांपासून फरार होता.

पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, अमृतपालला सकाळी ६:४५ वाजता अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला रोडे गावात घेरले त्यानंतर त्याला पळून जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता.

दरम्यान अमृतपालच्या अटकेवर त्याची आई बलविंदर कौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, अमृतपालने आत्मसमर्पण केले आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे कारण तो वाघ आहे आणि त्याने योद्धाप्रमाणे शरणागती पत्करली. आम्ही कायदेशीर लढाई लढू आणि लवकरात लवकर त्याची भेटही घेऊ.

तसेच अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनी दावा केला की त्यांचा मुलगा ड्रग्जच्या विरोधात लढत आहे. "अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचे आम्हाला टीव्हीवरून कळले. तो ड्रग्जच्या विरोधात काम करत होता, लोकांना वाचवण्यासाठी काम करत होता. त्यांना वाचवणाऱ्या तरुणांची सरकार बदनामी करत आहे, असे तरसेम सिंग म्हणाले.

भगवंत मान यांनी सांगितला अमृतपालच्या अटकेचा थरार -

अमृतपाल सिंग याच्या अटकेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मान यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कारवाईची आपल्याला आधीच पूर्ण कल्पना होती आणि यामुळे आपण रात्रभर झोपलो नाही, असे ते म्हणाले.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अटकेपूर्वीच्या घटनांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मी दर १५ मिनिटांनी पोलिसांशी बोलत होतो. माझा एकच हेतू होता, अटकेदरम्यान रक्तपात होता कामा नये. पंजाबसाठी मी रात्री झोपलो नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे महत्त्वाचं, असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT