mother commits suicide with her son and daughter at Nipani 
देश

निपाणीजवळ आईसह दोन मुलांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

निपाणी :  पांगिरे-बी (ता. निपाणी)  येथे आईने दोन मुलांसह स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 26) रात्री उघडकीस आली. सरिता तानाजी शिंदे असे आत्महत्या करून घेतलेल्या महिलेचे तर गायत्री तानाजी शिंदे (वय 7) व संस्कार तानाजी शिंदे (वय 4) अशी मुलांची नावे आहेत. घटनेचे कारण मात्र समजू शकलेले नाही. घटनेची नोंद करण्याचे काम निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोन चिमुरड्यांचासह  आईने आत्महत्या केल्याने पांगिरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.       

याबद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पांगिर- बी येथील ज्योतिर्लिंगवाडी परिसरात सरिता शिंदे व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. आज (ता. 26) सरिता शिंदे व त्यांचे कुटुंबीय नजीकच्या गावातील यात्रेला जाऊन आले होते. दुपारी तानाजी शिंदे जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेले होते. तर घरातील सरिता यांचे सासू-सासरे व अन्य सदस्य शेतावर गेले होते. घरी कोणी नसताना सायंकाळी सरिता व त्यांच्या मुलांनी आत्महत्या केली.

गायत्री इयत्ता पहिलीत शिकत होती तर संस्कार हा बालवाडीत जात होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक मिथुनकुमार, मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक,  पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा कार्य सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT