mother
mother esakal
देश

Google सर्चच्या मदतीने मातेने संपवलं 3 महिन्यांच्या लेकीला

सकाळ डिजिटल टीम

उज्जैन : मातृत्व हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. आई म्हणजे ममता.. आई म्हणजे आत्मा.. आणि आई म्हणजे ईश्वर... मायेची पाखरण करणारी एक स्त्री. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. पण उज्जैनमध्ये मातृत्वाला काळीमा फासणारी घटना समोर येतेय. एका निर्दयी आईचं भयानक कृत्य समोर आलंय...धक्कादायक म्हणजे मुलीला कसं मारायचं हे आईनं गुगलवर (Google) सर्च केलं होतं.

मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

उज्जैन येथील खाचरौद येथील रहिवासी अर्पित भटेवरा यांची 12 ऑक्टोबरच्या दुपारी तीन महिन्याची मुलगी विरती (३ महिन्यांचं बाळ) बेपत्ता झाली होती. अर्पितने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. शोधाशोध केली असता घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये विरतीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची बारकाईनं तपासणी केली असता विरतीला आई स्वाती भटेवरा (28) हिने पाण्याच्या टाकीत फेकल्याचं समोर आलं. स्वातीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि अर्पितचं लग्न फेब्रुवारी 2019 साली झालं होतं. यावर एएसपी आकाश भुरिया यांनी सांगितलं की, विरती 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.20 ते 1.40 च्या दरम्यान घरातून बेपत्ता झाली. त्यावेळी अर्पित घराच्या खाली असलेल्या दुकानात होता. वडील काही वेळापूर्वी बाहेर गेले होते. घरात स्वाती आणि तिची सासू अनिता भटेवरा वगळता कोणीच नव्हते. चौकशीत स्वाती संशयाच्या भोवऱ्यात अडकली गेली. असं आढळून आलं की, तिनं मोबाईलमध्ये 10 ऑक्टोबर रोजी इंटरनेटवर शोधलं होतं की पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू कसा होऊ शकतो.

मुलीला कसं मारायचं? गुगलवर सर्चवरून मिळवली माहिती

12 ऑक्टोबर रोजी खळबळजनक हत्ये प्रकरणात पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 3 महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या आईला अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपी आईनं गुगलवर सर्च केलं की, मुलीला बुडवून कसं मारता येईल. अखेर 12 ऑक्टोबर रोजी आईनंच मुलीची हत्या केली. सोशल मीडियावर मुलांना मारण्याचा माहिती शोधत असल्याचं समजल्याचं कळताच पोलिसांनी आईला अटक केली. मात्र, यापूर्वी पती अर्पित, सासू अनिता आणि सासरे सुभाष भटेवरा यांनी मुलीची आई स्वातीवर हत्येचा संशय व्यक्त केला होता.

निर्दयी आईला अटक

उज्जैनमध्ये (Ujjain)एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना उज्जैनच्या खाचरोड भागातील आहे. येथे राहणाऱ्या भटेवरा कुटुंबातील तीन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. मुलीच्या हत्येचा संशय मुलीच्या आईवर होता आणि तो संशय खरा निघाला. येथे एका निर्दयी आईनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात (Baby Girl) बुडवून मारून टाकलं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीला कसं मारायचं हे आईनं गुगलवर (Google) सर्च केलं होतं. निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT