Mother and Plate Sakal
देश

तब्बल 24 वर्ष एकाच ताटात जेवत होती आई; निधनानंतर उघड झाले गुपितं

सकाळ डिजिटल टीम

आई आणि लेकरातलं प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नाही. अनेकवेळा आपल्या लेकरांचं पोट भरावं म्हणून आई आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या लेकरांना खाऊ घालत असते. मुलांना मोठं करण्यात आईचा मोठा त्याग असतो. तर आईच्या प्रेमावर अनेक पुस्तकही लिहिली गेली आहेत. अनेकजण आपल्या आईच्या प्रेमाच्या गोष्टी सांगत असतो पण सध्या एका आईच्या प्रेमाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

ही स्टोरी ऐकून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. एक आई मागच्या २४ वर्षापासून एकाच ताटात जेवण करायची. त्यामागचं कारणही तसंच होतं. पण आईच्या निधनानंतर या गोष्टीचे गुपित उघडे झाले आहेत. विक्रम बुद्धनेसन असं या व्यक्तीचं नाव असून त्याने आपल्या आईच्या निधनानंतर ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. आईसोबतचा एक फोटो आणि आई ज्या ताटात जेवायची त्या ताटाचा एक फोटो त्याने पोस्ट केला आहे.

"ही अम्माची प्लेट आहे, ती मागच्या २४ वर्षापासून या प्लेटमध्ये जेवत होती. ही छोटीसी प्लेट आहे. ती फक्त मला आणि माझ्या भाचीला या प्लेटमध्ये जेवण द्यायची. पण तिच्या निधनानंतर मला माझ्या बहिणीकडून या गोष्टीचं गुपित कळालं. मी सातवीच्या वर्गात शिकत असताना मला ही प्लेट बक्षिस म्हणून मिळाली होती." असं विक्रम याने ट्वीटरवर पोस्ट करत लिहिलं आहे.

दरम्यान, "१९९९ मध्ये मी ही प्लेट बक्षीस म्हणून जिंकली होती. मागच्या २४ वर्षे आईने याच प्लेटमध्ये जेवण केलं पण तिने मला सांगितलं सुद्धा नाही. मी सध्या माझ्या आईला मिस करतोय" असं त्याने लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT