Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
देश

इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या महागाईमुक्त भारत आंदोलनाला आज सुरवात झाली. इंधनाचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी संसदेजवळ धरणे आंदोलन केले. गॅस सिलिंडर, मोटार सायकल यांना पुष्पहार घालून दरवाढीची खिल्ली उडविण्यात आली.

या आंदोलनांतर्गत काँग्रेसने दोन ते चार एप्रिल दरम्यान तालुका आणि जिल्हा पातळीवर, तर सात एप्रिलला प्रत्येक राज्याच्या राजधानीत निदर्शनांची घोषणा केली आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज संसदेजवळील विजय चौकात राहुल यांच्यासह लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक सिंघवी, के. सी. वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल यांच्यासह अन्य काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. राहुल यांनी मोटार सायकल तसेच गॅस सिलिंडरला पुष्पहार घालून आंदोलनाला सुरवात केली.

मागील दहा दिवसांत नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या असून याचा थेट फटका सर्वात गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे.दरम्यान, सकाळी आंदोलनानंतर दुपारी महिला काँग्रेस कार्यकर्त्या संसदेला घेराव घालण्यासाठी जाऊन पोचल्या. यामुळे सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी रेडक्रॉस मार्गावरील संसदेची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे संसदेतून बाहेर पडणाऱ्यांना आंदोलन संपेपर्यंत ताटकळत थांबावे लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्यावेळी दरवाढ होऊ दिली नाही. आता दर वाढविले जात आहेत. गॅस सिलिंडरचे दर दुप्पट झाले असून दिल्लीत पेट्रोल १०२ रुपये लिटरवर पोहोचले आहे. असे आजपर्यंत कधी झाले नव्हते. सरकारचे धोरण स्पष्ट आहे की गरिबांच्या खिशातून पैसे काढा आणि दोन चार उद्योगपतींच्या हातात द्या.

- राहुल गांधी, काँग्रेस नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT