Bus Fire accident Esakal
देश

Bus Fire accident: मध्य प्रदेशात भीषण अपघातानंतर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू, १४ जखमी

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुना-आरोन रोडवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी झाली आणि बसने पेट घेतला.

गुना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) यांनी पीटीआयला सांगितले की, आगीच्या घटनेत बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि इतर 14 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा बस आरोनच्या दिशेने जात होती, तर डंपर गुनाच्या दिशेने जात होता. घटनेच्या वेळी बसमध्ये 30 प्रवासी होते आणि त्यापैकी चार जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मोहन यादव यांनी ट्वीट करत म्हटलं की, "गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे.''

"भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याची तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.''.

बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी आणि एसपी (पोलीस अधीक्षक) यांच्याशी बोललो आणि त्यांना मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT