MP Assembly Election 2023 
देश

MP Election 2023: मध्यप्रदेशात ४७२ उमेदवार 'कलंकित'; भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्यावर १७५ गुन्हे दाखल

रोहित कणसे

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) ने निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. एडीआरच्या अहवालानुसार, २०२३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण २,५३४ उमेदवारांपैकी ४७२ (१९ टक्के) उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एडीआरच्या आकडेवारीनुसार, उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्या उमेदवारांनी स्वतःवर गुन्हे नोंदवले आहेत त्यांची संख्या २९१ (११ टक्के) आहे.

भाजपचे सुरेंद्र पटवा आघाडीवर

या यादीत भाजपचे उमेदवार सुरेंद्र पटवा यांचा पहिला क्रमांक असून त्यांच्यावर तब्बल १७५ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यानंतर भारत आदिवासी पक्षाचे उमेदवार कमलेश्वर डोडियार आहेत, ज्यांच्यावर १५ गुन्हे दाखल आहेत.

काँग्रेसचे उमेदवार पीसी शर्मा (प्रकाश मांगीलाल शर्मा) यांच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसचे आणखी एक उमेदवार सुनील शर्मा यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल आहेत. भाजपचे उमेदवार बिसाहू लाल सिंह यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल आहेत.

ए़डीआरने आपल्या विश्लेषणात म्हटले आहे की काँग्रेसच्या २३० उमेदवारांपैकी १२१ (५३ टक्के) उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केला आहे. तर ६१ (२७ टक्के) जणांनी गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे मान्य केले आहे.

जर भाजपबद्दल बोलायचे झाले, तर त्यांच्या २३० उमेदवारांपैकी ६५ (किंवा २८ टक्के) उमेदवारांनी स्वतःवर दाखल केलेले गुन्हे स्वीकारले आहेत. तर २३ (१० टक्के) जणांनी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे.

एडीआरने म्हटले आहे की ६६ आप उमेदवारांपैकी २६ (३९ टक्के) यांनी स्वतःविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे घोषित केली आहेत, तर १८ (२७ टक्के) यांनी त्यांच्या शपथपत्रात गंभीर गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केला आहे.

बसपाच्या १८१ उमेदवारांपैकी १६ (९ टक्के) उमेदवारांनी गुन्हेगारी नोंदी जाहीर केल्या आहेत, तर १६ (९ टक्के) उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा

निवडणूक लढवणाऱ्या २४ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. यापैकी १ उमेदवाराने सांगितले की, आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय १० उमेदवारांनी खुनाशी संबंधित खटले (IPC कलम ३०२) घोषित केले आहेत आणि १७ उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटले (IPC कलम ३०७) घोषित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT