MP Assembly Election Final Phase Meetings Roadshow of pm narendra modi amit shah rahul gandhi kharge esakal
देश

MP Assembly Election: अखेरच्या टप्प्यात दिग्गज मैदानात; पंतप्रधान मोदी, शहा, राहुल गांधी, खर्गे यांच्या सभा, रोडशो

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या दिगग्ज नेत्यांचा झंझावात पाहायला मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या दिगग्ज नेत्यांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आज दोन प्रचार सभा घेत इंदोरमध्ये रोडशो करणार आहेत तर कांग्रेसचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे प्रचारसभा घेणार आहेत.

तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंदीय मंत्री अमित शहा, ज्योतिरादित्य शिंडिया, आणि काँग्रेसचे कमलनाथ, दिग्विजय सिंह हेही राज्य पिंजून काढत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आपापली ताकद लावत आहेत.

मध्यप्रदेश विधानसभेसाठी 17ला मतदान होत आहे. प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस आहेत. या दोन दिवसात राज्यात प्रचाराचा जोर वाढनार आहे. टक्कर कांटेची असल्याने भाजप आणि काँग्रेसचे दिगग्ज पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बैतुल, शाजापूर येथे प्रचारसभा घेणार असून संध्याकाळी इंदोरमध्ये रोडशो करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा हे देखील दोन दिवसांपासून राज्यात प्रचारसभा घेत काँग्रेस वर टीकेची झोड उठविली आहे. तर ज्योतिर्यदित्य शिंधिया हेही राज्यात तळ ठोकून प्रचारसभा घेत आहेत.

काँग्रेसनेही भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. भ्रष्टाचार आणि सामाजिक मुद्दे मांडत काँग्रेस नेते मतदारांसमोर जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल भोपाळमध्ये केलेल्या रोडशोमुळे काँग्रेसला जोश आला आहे. राहुल गांधी आज विदिशा, शोजपुरमध्ये प्रचारसभा घेत आहेत तर मल्लिकार्जुन खर्गे हेही अनेकठिकाणी प्रचारसभा घेणार आहे.अखेरच्या दिवशीही दोन्ही पक्षाकडून जोर लावला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT