MP Assembly Election 
देश

MP Assembly Election: निवडणुकीत उभं रहायची हौस, उपजिल्हाधिकारी पदाचा दिला राजीनामा; पण काँग्रेसने...

सकाळ वृत्तसेवा

MP Assembly Election: काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश करावा त्यानंतर विचार करू, असा सल्ला देऊन त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार विरोधात उघड भूमिका

बैतुल जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा बांगरे यांनी शिवराजसिंह चौहान सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेचे काँग्रेसने समर्थन केले होते. तेव्हापासून त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यासाठी त्यांनी गेल्या जून महिन्यात उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना बैतुल जिल्ह्यातील आमला या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती.

परंतु राज्य सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर केला नाहीच उलट त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचा ससेमिरा लावला. अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून राजीनामा मंजूर करून घ्यावा लागला. परंतु तोपर्यंत काँग्रेसने आमला मधून मनोज माल्वे यांना उमेदवारी घोषित केली.

भविष्यात दखल घेऊ

निशा बांगरे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसची सदस्यत्व स्वीकारा, त्यानंतरच आपल्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार निशा बांगरे यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. (Latest Marathi News)

परंतु निशा बांगरे यांना सध्यातरी पक्षसंघटनेत काम करावे लागेल. मात्र  भविष्यात निशा बांगरे यांच्या कार्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांनी निशा बांगरे यांच्या उमेदवारीवर फुली मारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT