MP Assembly Election 
देश

"माझं संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय गेलं, आधी लग्न करुन द्या..."; निवडणुकीत ड्युटी नाकारलेल्या शिक्षकाचे पत्र!

Sandip Kapde

MP Assembly Election: मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्युटी लावण्यात येणार आहे. त्यांना शासनाकडून याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र एक संस्कृत शिक्षक प्रशिक्षणासाठी गेले नाहीत. त्यामुळे त्यांना याचा जाब विचारला असता त्याने लग्नाची मागणी केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या शिक्षकाला प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली. नोटीसला उत्तर देताना शिक्षक अखिलेश कुमार मिश्रा यांनी लिहिले, "माझे संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय गेले आहे. आतापर्यंतच्या सगळ्या रात्री वाया गेल्या आहेत. सगळ्यात आधी माझं लग्न करा". (MP Election News)

पत्रात अखिलेश यांनी साडेतीन लाख रुपयांचा हुंडा मागितला आहे. याशिवाय फॅल्ट खरेदीसाठी कर्ज मंजूर करण्याची मागणी देखील केली आहे.पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिले, 'मी काय करू? माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही ज्ञानाचा सागर आहात.

शिक्षक अखिलेशकुमार मिश्रा यांच्या या जबाबानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित केले. अखिलेश यांच्यासोबत काम करणाऱ्या काही लोकांनी सांगितले की, ते काही वर्षांपासून तणावाखाली आहेत. अन्यथा असे पत्र कोण लिहिते. गेल्या एक वर्षापासून ते फोनही वापरत नसल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT